बातम्या

बिग बींनी घेतला संपत्तीविषय महत्वाचा निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क

काही दिवसापूर्वी ‘केबीसी’च्या सेटवर ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्याशी बोलताना बिग बींनी त्यांची अमाप संपत्ती कोणत्या व्यक्तीच्या नावावर करणार हे जाहीर केलं.
अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी आणि संपत्ती मिळविलेला अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन. आज अभिनयामुळे विशेष ओळखले जाणारे बिग बी अनेक वेळा त्यांच्या लक्झरी लाईफ आणि संपत्तीमुळेही चर्चेले जातात. जवळपास २०० चित्रपट करणारे बिग बी यांनी आजवर अमाप संपत्ती कमावली आहे. त्यामुळे उतरत्या वयामध्ये ते ही संपत्ती कोणाच्या नावावर करणार असा प्रश्न अनेक वेळा चाहत्यांना पडतो. सध्या बिग बी छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असून या सेटवर त्यांनी संपत्ती कोणाच्या नावावर करणार हे जाहीर केलं आहे.

 केबीसीच्या सेटवर सिंधुताई यांनी हजेरी लावली होती.. त्यावेळी मुंलीना भेडसावणाऱ्या समस्येवर चर्चा केली.. यावेळी संपत्तीचा विषयावर चर्चा सुरू असताना,“माझी संपत्ती मी माझ्या दोन्ही मुलांना समसमान वाटून देणार आहे, असं सांगितलं.

अनेक वेळा मी सांगितलं आहे आणि आज पुन्हा एकदा सांगतो. जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा मी माझी जी काही थोडीफार संपत्ती आहे ती माझ्या दोन्ही मुलांनी देणार आहे. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. या दोघांमध्ये मी संपत्तीचे समान वाटण्या करणार आहे. दोन्ही मुलांना समसमान संपत्ती मिळाली पाहिजे. मग काही असो”, असं अमिताभ बच्चन म्हणाले.


सूत्रांच्या माहितीनुसार, बिग बींची एकंदरीत संपत्ती ३६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यासोबत त्यांचे ‘जलसा’ आणि ‘प्रतीक्षा’ हे दोन बंगले असून र्सिडीज, बीएमडब्ल्यू, पोर्श, लेक्सस, फॅन्टम अशा अनेक गाड्या आहेत.

Web Title: Amitabh Bachchan Property Will Equally Divided Between Abhishek Shweta Bachchan Kbc 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar Pune | प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

Today's Marathi News Live: अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट

Ruchira Jadhav: अवतरली सुंदरी... रुचिराचा मनमोहक साडी लूक!

Rahul Gandhi: सत्तेत आल्यास 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार, आरक्षणावर राहुल गांधींची मोठी घोषणा

Dindori Lok Sabha: आधी थोपटले दंड आता मिळवले हात; दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांची माघार

SCROLL FOR NEXT